थोडे काहीतरी...... शालार्थ/shalarth विशेष...
IDEA & written by PATHAN MUSHTAQUE (ठा .म.पा. शिक्षण मंडळ ,शाळा क्र .११७ कौसा ).......
मार्गदर्शक : 1)श्री.सुनील शंकर फापाळे
(अध्यक्ष - शिक्षक सेना,ठाणे जिल्हा)
2)श्री जाहीद अली सय्यद (सी आर सी गट कर्मांक ०७ ठाणे महानगरपालिका
)सल्लागार :
श्री. अब्दुल शफ़िक़ (ठा .म .पा .शाळा क्र .११७) श्री सय्यद जावेद (ठा .म
.पा .शाळा क्र .७४).
- शालार्थ -ओळख
- शालार्थ - प्रवेश
- शालार्थ - पायरी एक SINGING AUTHORITY
- शालार्थ - पायरी २ OFFICE DETAILS
- DDO ची कामे..
- शालार्थ - पायरी ३ BILL GROUP
- शालार्थ - पायरी ४ EMPLOYEE DETAILS
- शालार्थ - पायरी 5 EMPLOYEE INFORMATION
- शालार्थ - पायरी 6 देयक निर्मिती
- MDC विषयी -भाग 1
- MDC विषयी -भाग 2
- थोडक्यात पायऱ्या..
- आपल्या मदतीसाठी..
- विशेष धन्यवाद..
शालार्थ : ओळख
शालार्थ : ओळख
शालार्थ प्रणाली ही महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या वेतनासंबंधी एकीकृत वित्तीय प्रबंधन प्रणाली ( integrated financial managment System) अंतर्गत TATA CONSULTANCY SERVICES च्या सहायाने शालेय शिक्षण विभागात अंतर्भूत करण्यासाठी विकसित केली आहे. सर्व कर्मचारी व त्यांचे वेतन यांचा एक सामाईक डेटाबेस असावा हा यामागील महत्वाचा हेतू........ "सेवार्थ " या प्रणालीच्या यशानंतर शालार्थचा विकास झाला. सध्या महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हि प्रणाली वापरली जाणार आहे. ठाणे ,पुणे, नागपूर ,लातूर इ . जिल्ह्यांमध्ये तिच्याविषयी प्रशिक्षणाच्या माध्यमातून चर्चा सुरु झाल्या आहेत. ही कागद विरहित वेतन देयक निर्माण करणारी प्रणाली अनेक दृष्टीने उपयोगी ठरणार आहे.
फायदे :- १) देयक निर्मिती , देयक प्रस्तुतीकरण ,देयक लेखापरीक्षण ,कर्मचारी वेतन या सर्व गोष्टी इलेक्ट्रोनिक माध्यमातून होणार आहेत .
२) वितीय शिस्त निर्माण होण्यास मदत होणार आहे.
३) वेतन निश्चित तारखेला मिळेल . प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळणे अपेक्षित आहे.
४) वेतनाची लांबलचक चालणारी प्रक्रिया अचूक आणि आटोपशीर होण्यास मदत
५) maker -checker या तत्वावर हि प्रक्रिया उभी आहे.
६) अचूक देयके निर्माण होतील .
७) वेतनाचा इतिहास अगदी सहज उपलब्ध होईल.
८) कर्मचारी महाकोश निर्माण होईल...
९) कर्मचारी माहिती आणि वेतन TREASURY NET आणि BEAMS (BUDGET ESTIMATION AUTHORIZATION & MONITORING SYSTEM ) या प्रणाली प्रणाली सोबत विनिमित होईल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशासनात अश्या योजना नक्कीच मैलाचा दगड ठरतील यात शंका नाही...
कसं वाटल !! Subscribe to: Post Comments (Atom)
2 comments:
धागे-दोरे